Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगावच्या विकासासाठी आपले सरकार कटिबध्द- पंतप्रधान

Share

जळगाव :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचार सभेचा शुभारंभ जळगावातून झाला. सभेला प्रचंड गर्दी होती. सुरूवातीला मुख्यमंत्री यांनी आपले भाषण केले. यानंतर पंतप्रधान यांनी बहिणाबाई, वाल्मीक ऋषींना नमन करत भारत मातेच्या जयघोषाने भाषणाला सुरूवात केली.
जळगावातून जलसंकल्पाची सुरूवात

जळगावसह उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानला गती मिळणार असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. त्याचप्रमाणे महिलांना पाण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळावी यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. शेती, उद्योगांसाठी पाणी, विज, युवकांना रोजगार, जळगावची केळी, रेल्वे, महामार्ग उन्नत्तीच्या मार्गावर असल्याचे नमूद केले.

देवेंद्र सरकारचे केले अभिनंदन
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या खात्यावर किसान योजनेची अंमलबजावणी सुरूळीत सुरू असल्याचे सांगत आधारलिंकमुळे अडथळा येत असून तो लवकरच दूर होईल अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा सफाया
राज्यात भाजप-सेना महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टिकास्त्र सोडले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!