Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

अखेर पी. चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात

Share

नवी दिल्ली- आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अखेर 28 तासानंतर ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआय पथकाने तब्बल दीड तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले आहे. चिदंबरम यांनी घराचे गेट बंद ठेवले होते. सीबीआय टीम कंपाऊंडवरून उड्या मारून आत जाऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे. हा महाव्होल्टेज ड्रामा सुरू असताना चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

चिदंबरम काँग्रेस मुख्यालयातून घरी गेल्याचे कळताच सीबीआयच्या पथकाने दिल्लीतील जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गेटवरून उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर तब्बल दीड तास चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू संघवीही उपस्थित होते. चौकशी अंतिम टप्प्यात असताना सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी बोलावले आणि जमावाला पांगवून चिदंबरम यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी चिदंबरम यांनी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

सीबीआय पथकाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर सीबीआय आणि ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिदंबरम यांच्या घराच्या गेटवर सीबीआय व ईडीच्या पथकाला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!