Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांची ११ देशात मालमत्ता

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था 

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची विदेशातही संपत्ती असल्याचा दावा सक्तवसुली संचलनाल्याने ईडीने केला आहे.

यानुसार या प्रकरणातील सहआरोपींसह चिदंबरम यांनी परदेशात संपत्ती विकणे आणि परदेशी बँक खाती बंद केल्याच्या पुराव्याशी छेडछाड केली असल्याचे म्हटले आहे. इडीकडून चिदंबरम यांच्या कोठडीत वाढ करण्याबाबतच्या मागणीदरम्यान ईडीने सुप्रीम कोर्टात हा युक्तीवाद केला.

चिदंबरम यांचे अनेक देशांत बँकेची खाती आहेत. यात अर्जेंटिना, ऑस्ट्रीया, ब्रिटीश वर्जिन, आइसलँड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनाको, फिलीपाइन्स,सिंगापूर, द. आफ्रिका, स्पेन, श्रीलंका या देशांत मालमत्ता खरेदी करत बँक खाती उघडल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बनावट कंपन्यांच्या माध्यमातूनही या खात्यांत व्यवहार झाले असल्याचे म्हटले गेले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!