Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ओझोन संरक्षण दिनविशेष : जनजागृती गरजेची…अन्यथा वाईट परिणाम

Share

नाशिक | प्रतिनिधी 

१९९५ पासून दरवर्षी १६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो. ओझोन थराच्या संरक्षणासाठी १९८७ साली आजच्याच दिवशी कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या.

ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा हा करार होता. पृथ्वीला आणि पर्यायाने पृथ्वीवासीयांना घातक गोष्टींपासून वाचवणार्‍या ओझोन थराचे संरक्षण करण्याबाबत सजगता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना प्रयत्नशील असते. पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याची जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो.

दरम्यान, वातावरणीय बदल, पर्यावरणाचा वाढलेला ऱ्हास यामुळे मोठ्या प्रमाणात ओझोनला धोका पोहोचत आहेत. यासाठी ओझोन संरक्षण दिनाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी , नव्या पिढीला याबाबत माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नाशिक शहरातील डी. डी. बिटको बॉईज आणि वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये विजय गोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी त्यांनी सुर्याच्या अतिनील किरणांपासून ओझेन वायू सजीवांचे संरक्षण करतो हे त्यांनी पटवून दिले. तसेच फ्रिज व एसीमधून निघणारे घातक वायू ओझोन वायूचा नाश करतात.

त्यामुळे फ्रिज व एसी वापरणे टाळले पाहिजे. तसेच कार्बनासुराची पौरणिक कथेच्या स्वरूपात त्यांनी ओझोन वायूचे महत्त्व पटवून दिले. ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो हे पटवून दिले.

ओझोन थराला वाचविण्यासाठी जास्तीत जास्त तुळसीची रोपांची लागवड केली पाहिजे हे सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका काळे, उपमुख्याध्यापिका पेंढासरकर तसेच प्रदीप गोळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

व्हिडीओ आणि प्रतिक्रिया : गुंजन दुसानिस, श्वेता खोडे आणि सना शेख

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!