ओझरखेड धरण क्षेत्रालगत मायलेकाची हत्या

0

वणी । दि. 5 प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील कृष्णगाव शिवारात अज्ञात मारेकर्‍यांनी आई व मुलाचा खून केल्याने खळबळ उडाली असून वणी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णगाव शिवारात ओझरखेड धरण गाळपेरा क्षेत्रालगत असलेल्या शेळकेवाडी येथील एका झोपडीत शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान सविता गोटीराम सहाळे (वय 30) व मुलगा करण गोटीराम सहाळे (वय 10) खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत वणी पोलिस ठाण्यात मयत सविता सहाळे हिचा मामा संजय गांगोडे (रा. शेळकेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सविता सहाळे ही आपला मुलगा करण यांच्यासमवेत शेळकेवाडी येथे वास्तव्यास होते. दहा वर्षा पूर्वीच सविताच्या पतीचा मृत्यु झाला असून करण हा ओझरखेड येथे इयत्ता तिसरीत शिकत होता.

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान संजय गांगोडे यांची मुलगी सविता यांच्या घराकडे गेली असता घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसल्याने घरात हत्या झाल्याची समजले.

याबाबत वणी पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी व पोलीस पाटील राजेंद्र सुकदेव महाले घटना स्थळी दाखल झाले व घटनेची पाहणी करुन पंचनामा केला.

सुमारे 24 तासापेक्षा अधिक काळ उलटून गेल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

तसेच, पोलीस अधिक्षक संजय दराडे व कळवण चे पोलीस उप अधिक्षक देविदास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

LEAVE A REPLY

*