Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हाधिकार्‍यांमार्फत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करावा - आयुक्त

जिल्हाधिकार्‍यांमार्फत ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करावा – आयुक्त

नाशिक । प्रतिनिधी

सद्या ऑक्सिजन गॅस सिलेंडरचा पुरवठा उत्पादक कंपन्यांकडुनच पुरेशा प्रमाणात होत नसल्याने ऑक्सिजन व व्हेंन्टीलेटर बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास कळवुन गॅस सिलेंडर उपलब्ध करुन घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी प्रशासनाला दिले.

- Advertisement -

नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असुन कोरोना संसर्ग रुग्णांना व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सतिश नाना कुलकर्णी यांनी आयुक्तांच्या कार्यालयात स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेते सतिश सोनवणे यांच्या समवेत सोमवारी (दि.7)बैठक घेतली.

यात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात पडुन असलेले व्हेन्टीलेटर संदर्भात चर्चा करण्यात आली. पंतप्रधान यांचे निधीतुन घेण्यात आलेले व्हेन्टीलेटर हे आवश्यकते नुसार मनपा हॉस्पिटलांमध्ये बसविण्यात आलेले असल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आले.

जे काही नादुरुस्त व्हेन्टीलेटर आहे, त्याची जबाबदारी बसविणार्‍या मक्तेदाराकडे नसल्याने कार्यान्वयीत होण्यास अडचण येत आहे. तसेच सदया ऑक्सिजन गॅस सिलेंडर यांचा पुरवठा उत्पादक कंपन्यांकडुनच पुरेशा प्रमाणात होत नसल्याने ऑक्सिजन व व्हेंन्टीलेटर बेड उपलब्ध होत नसल्याची माहिती आरोग्य वैद्यकिय विभागाच्या वतीने देण्यात आली.

यावर उपाय म्हणुन वैद्यकीय विभागास पुरेशा आवश्यक ऑक्सिजन गॅस सिलेंडरची आवश्यकता याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास कळवुन उपलब्ध करुन घेण्याबाबत आयुक्त जाधव यांनी प्रशासनाला आदेशित केले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच त्यावर उपाय योजना आणि कोरोना संसर्गाबाबत नाशिक शहरातील जनतेच्या माहिती करीता शहरातील रुग्णालयात असलेले ऑक्सिजन व व्हेंन्टीलेटर बेड उपलब्धता व इतर आवश्यक माहिती रोजच्या रोज स्थानिक वर्तमान पत्रातुन माहिती प्रसारीत करण्याचे आदेश आज देण्यात आले. त्यानुसार रेाजच्या रोज प्रशासनाच्या वतीने माहिती प्रसारीत केली जाणार आहे असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.

शहरात ठिक ठिकाणी अँन्टीजेन तपासणी करुन ज्या गतीने या बाबतचे अहवाल त्वरीत प्राप्त होतात, त्याच पध्दतीने आरटीपीसीआरचे अहवालही तातडीने प्राप्त होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन व व्हेंन्टीलेटर बेड वाढविण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, उपआयुक्त प्रशासन मनोज घेाडेपाटील, उपआयूक्त प्रदिप चौधरी, अधिक्षक अभियंता एस. एम. चव्हाणके, वैदयकीय अधिक्षक डॉ. बापुसाहेब नागरगोजे, डॉ.आवेश पलोड आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या