Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकरोना लस कधी येणार? किंमत काय? सर्वच माहिती जाणून घ्या

करोना लस कधी येणार? किंमत काय? सर्वच माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली

जगभरातील अनेक देशात करोना व्हायरसचे पुन्हा आक्रमण झाले आहे. यामुळे सर्वांचच लक्ष करोनाच्या लसीकडे आहे. भारतातही करोनाची लस कधी येणार याची लोक वाट पाहत आहेत.

- Advertisement -

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, करोनाची लस फेब्रुवारी महिन्यापर्यंत बाजारात येऊ शकते. २०२१ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ऑक्सफोर्डच्या लसीचे ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध केले जातील.

आधी यांना मिळणार लस

आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांसाठी ऑक्सफोर्ड कोविड-१९ ची लस पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत आणि सर्वसामान्यांसाठी एप्रिलपर्यंत उपलब्ध होऊ शकते. २०२४ पर्यंत प्रत्येक भारतीयाला लस मिळाली असेल.

लसीची किंमत काय असेल

अदार पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत भारतात अधिकाधिक १००० रुपये असेल. लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. प्रत्येक डोसची किंमत ५०० ते ६०० च्या दरम्यान असेल. तर सरकारकडून हे दोन्ही डोस सर्वसामान्यांसाठी जवळपास ४४० रुपयांत उपलब्ध करून दिले जातील.

- Advertisment -

ताज्या बातम्या