Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये १६ हजार ३९६ मतदारांची ‘नोटा’ला पसंती

Share

नाशिक । प्रतिनिधी

प्रत्येक निवडणुकीत राजकीय उमेदवारांना किती मते मिळाली याबरोबरच किती जणांनी ‘नोटा’ बटण दाबले हा देखील चर्चेचा विषय ठरतो. यंदा नाशिक व दिंडोरी मतदारसंघ मिळून तब्बल 16 हजार 396 मतदरांनी नोटाला पसंती दिली. विशेष म्हणजे नाशिकच्या तुलनेत दिंडोरी मतदारसंघात नोटा बटण दाबणार्‍यांचे प्रमाण जादा आहे.

देशभरातील मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाली असून जय -पराजयाचे आकडेवारी समोर येत आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण ज्वायंट किलर ठरले, कोणाचा धुराडा उडाला व कोणते दिग्गज घरी बसले, याची गल्ली बोळात खुमसदार चर्चा रंगत आहे. देश अजूनही लोकसभा निवडणुकीच्या फिव्हरमध्ये आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खा.हेमंत गोडसे तर, दिंडोरीत भाजपच्या डॉ.भारती पवार यांंनी ऐतिहासिक विजय मिळवला. या दोन्ही मतदारसंघातील ‘नोटा’ ची आकडेवारी देखील समोर येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा हजार 950 मतदारांनी ‘नोटा’चे बटण दाबले. तर, दिंडोरीत नऊ हजार 446 मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीतील आकडेवारीनूसार 16 हजार 396 मतदारांनी उमेदवारांना नाकारत ‘नोटा’ला पसंती दिली. ‘नोटा’ दाबण्यात शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदार पुढे होते.

‘नोटा’चे प्रमाण घटले

2014 लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात आठ हजार 916 मतदारांनी नोटा बटण दाबले होते. यंदा हे प्रमाण 1 हजार 966 ने घटले आहे. तर, दिंडोरीत देखील नोटाचे प्रमाण ंगतवेळेच्या तुलनेत घटले. गतवेळी दहा हजार 897 मतदारांनी नोटा दाबला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!