Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

के. के. वाघ संस्थेत 500 हुन अधिक विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस प्लेसमेंट’

Share

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या कॅम्पस प्लेसमेंट्समध्ये ५०० पेक्षा आहे. या शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 500 हुन अधिक विद्यार्थ्यांची महाविद्यालय कॅम्पसमधून विविध बहुराष्ट्रीय उद्योगसमूहामध्ये नोकऱ्यांसाठी निवड झाली आहे.

या शैक्षणिक वर्षात एकूण 100 हुन अधिक नामांकित उद्योग समूहांमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. पी. के. शहाबादकर यांनी दिली.

यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, पर्सिस्टन्ट, विप्रो, कॉग्निझंट के.पी.आय.टी, इटर्नस, सायबेज, इत्यादी; कोअर क्षेत्रातील बॉश, महिंद्रा अँड महिंद्रा, महिंद्रा सोना, टाटा मोटर्स, ए.बी.बी., क्रॉम्प्टन ग्रीव्हज, के.एस.बी. पम्पस तसेच सार्वजनिक व सेवा क्षेत्रातील इंडियन नेव्ही, ऍमेझॉन,  मर्सन, बायजुझ आदी उद्योगांचा समावेश आहे.

खास म्हणजे, 1 ते 12 लाखामध्ये 3 विद्यार्थी, 4 ते 7 लाख यांमध्ये 56 विद्यार्थी,  3 ते 4 लाखमध्ये 174 विद्यार्थी आणि 2 ते 3 लाख 59 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महाविद्यालयाच्या ट्रैनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून प्रथम ते अंतिम वर्षापर्यंत सातत्याने घेण्यात येण्याऱ्या मॉक इंटरव्युव्ह, एप्टीट्यूड ट्रेनिंग, टीपीओ कनेक्ट, एक्स्पर्ट टॉक्स आदी विविध कौशल्य वर्धक प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे व अनुभवी प्राध्यापकांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे मनोगत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण विकसित होऊन एक समाजाभिमुख अभियंता निर्माण व्हावा यासाठी महाविद्यालय तत्परतेने कार्य करत आहे व भविष्यात देखील करत राहील असा विश्वास प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी व्यक्त केला आहे.

तसेच ज्या विविध उद्योगसमूहांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट द्वारे नोकरीची सुयोग्य संधी उपलब्ध करून दिली त्या सर्व उद्योगसमूहाचे आभार संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी व्यक्त केले आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. पी. के. शहाबादकर व सर्व विभागप्रमुखांनी अभिनंदन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!