Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे...

नाशिक शहरात १५ हजाराच्या वर किराणा दुकाने सुरू; कुठे गर्दी तर कुठे शुकशुकाट

नाशिक । २९  प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेल्या व्यावसायिक असलेल्या 15 हजार 410 आस्थापनांना शनिवार (दि.20) पर्यत अधिकृत प्रपत्र वाटप करण्यात आली आहे. यात 5 हजार 674 किराणा आणि 1 हजार 471 मेडीकल दुकानांचा समावेश आहे.

- Advertisement -

महापालिका प्रशासनाने गेल्या 25 मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेल्या आस्थापनांना प्रपत्र वाटपास प्रारंभ केला होता.

(फोटो : सतीश देवगिरे)

यात शुक्रवार (दि.28) मार्च पर्यत सहा विभागात 15 हजार 410 आस्थापनांना प्रपत्राद्वारे परवानगी दिली आहे. यात नाशिक पुर्व विभागात 1012 किराणा, 260 मेडीकल, भाजी – फळ विक्रेते 420, 12 पिठाची गिरणी, नाशिक पश्चिम विभागात 421 किराणा, 92 मेडीकल, 161 भाजी – फळे, 47 पिठाची गिरणी,

पंचवटी विभागात किराणा 1437, मेडीकल 203, 573 भाजी – फळ विक्रेते, 42 पिठाची गिरणी, नाशिकरोड 1400 किराणा, 800, 450 भाजी – फळ विक्रेते, 60 पिठाची गिरणी, सातपूर विभागात 845 किराणा, 118 मेडीकल, भाजी – फळ विक्रेते 118, पिठाची गिरणी 17 आणि नवीन नाशिक 559 किराणा, 54 मेडीकल, 205 भाजी – फळ विक्रेते, 24 पिठाची गिरणी अशाप्रकारे आस्थापनांना प्रपत्र वाटपाचे काम महापालिका प्रशासनाकडुन करण्यात आली आहे.

तसेच शहरात सहा विभागात रस्त्यालगत बसणार्‍या 91 ठिकाणी 78 व्यावसायिकांना महापालिका परवाना विभागाकडुन परवानगी देण्यात आली आहे. शहरात 14 भाजी मंडईतून 14 व्यावसायिक व्यावसाय करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या