Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘के.के.वाघ’अभियांत्रिकी, तंत्रनिकेतनच्या ९५ विद्यार्थ्यांना मिळाल्या नोकर्‍या

Share

नाशिक | प्रतिनिधी

के.के.वाघ शिक्षण संस्था संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन मध्ये नुकतेच विविध कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यूव (मुलाखती) घेतल्या. यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे अनुक्रमे 20 आणि 75 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

यामध्ये प्राज-10, बोस्लो-1, अ‍ॅम्बडो-12, जिंदाल स्टील-17, बजाज ऑटो-38,टाटा कन्सल्टन्सी-03, फ्लॅश इलेक्टॉनिक्स-03, कमिन्स-04 व ए बी बी-07 अशा विविध कंपन्यांमध्ये एकुण 98 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच टाटा मोटर्स, अनिताज मिक्रोसिस्टिम, विप्रो, सीसीए यांचे कॅम्पस मुलाखती झाल्या असून लवकरच त्यांचा निकाल जाहीर होणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाब सुमारे सरासरी अडीच ते चार लाखांपर्यंतचे पॅकेज देण्यात आले आहे.

इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, एमसीए या सर्वच विभागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

डिप्लोमा नंतरही अनेक चांगल्या संधी उपलब्ध असल्याचे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादातून निदर्शनास येत असून याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येऊ शकतो अशी माहिती तंत्रनिकेनचे ट्रेनिंग अँण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. पी. एम. मोहन यांनी दिली.

या प्रक्रियेत पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्ह्यूवमध्ये भाग घेता येेते. तसेच सुरवातीला प्री-प्लेसमेंट चर्चा द्वारे कंपनी विषयी माहिती, मुलाखतीची प्रक्रिया तसेच पॅकेज इत्यादी माहिती देण्यात येते.

त्यानंतर कंपनीच्या मुलाखतीमध्ये प्रथमतः ऑन-लाईन टेस्ट झाल्यानंतर टेकनिकल टेस्ट व वैयक्तिक मुलाखतीची फेरी घेण्यात येते. अशी माहिती अभियांत्रिकीचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट अधिकारी डॉ.पी.के.शहाबादकर यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्‍वस्त समिर वाघ, अशोक मर्चंट, सचिव प्रा.के.एस.बंदी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एन.नांदूरकर आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पी.टी.कडवे यांनी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!