Type to search

Featured नाशिक

चांदशी ग्रामपंचायत व नंदनवन बहुउद्देशीय मंडळातर्फे ३०० वृक्षांची लागवड

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरापाठोपाठ झपाट्याने विस्तार होत असलेल्या चांदशी गाव परिसरात चांदशी ग्रामपंचायत आणि नंदनवन बहुउद्देशीय मंडळातर्फे ३०० हून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे हा उपक्रम राबविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनीही मोठ्या उत्साहाने पुढाकार घेवून हा उपक्रम यशस्वी केला.

पर्यावरण संवर्धनासाठी सध्या सर्वत्र वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून नंदनवन बहुउद्देशीय मंडळातर्फे चांदशी ग्रामपंचायतीच्या सुमारे दोन एकर जागेवर ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये पिंपळ, कडूनिंब, कदंब, आवळा, आंबा, बदाम, सोनचाफा यांसारख्या फळे, फुले आणि फळांच्या झाडांचा समावेश आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमात उपसरपंच गोदावरी गायकर, ग्रामसेवक भाम्बारे, माजी उपसरपंच राहुल पाटील, दौलत पाटील, वास्तुविशारद प्रशांत चौधरी, प्रवीण पवार, रामदास सोनावणे, प्रकाश सापनर, राजीव कुलकर्णी, दिनकर जाधव, राजेश महाले, दत्तात्रय सोनवणे, प्रकाश मुळे, डॉ. सोनवणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ग्रामसेवक भामरे यांनी या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी चांदशी ग्रामपंचायततर्फे ठिबक सिंचन कार्यान्वित करणार असल्याचे यावेळी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!