Thursday, May 2, 2024
Homeनाशिकबापरे! शहरातील एवढ्या पोलिसांना करोनाची लागण

बापरे! शहरातील एवढ्या पोलिसांना करोनाची लागण

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा ग्रामीण नंतर आता करोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव शहर पोलीस दलात झाला आहे…

- Advertisement -

आतापर्यंत सव्वाशे पेक्षा अधिक पोलीस बाधीत झाले असून या पैकी 110 जणांनी करोनावर मात केली आहे. तर एकट्या सातपूर पोलीस ठाण्यात 9 जण बाधीत असल्याचे समोर आले आहे.

करोनाच्या प्रारंभीच्या काळापासून काळजी घेण्यासह विविध उपायोाजना राबवल्याने अद्याप नाशिक शहर पोलीस दल करोनापासून मुक्त होते. परंतु हळूहळू शहर पोलीस दलात करोनाचा शिरकाव झाला असून तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या 146 पैकी 129 पोलिस करोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत.

त्यापैकी 110 जण पूर्ण बरे झाले तर, शहर पोलिस दलातील 17 कर्मचार्‍यांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, 17 जण होम क्वारंनटाईन झाले आहेत. इंदिरानगर आणि अंबड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना करोनाची लागण झालेले दोन करोना योध्दे शहीद झाले आहेत.

सातपूर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकार्‍यासह तब्बल 9 जणांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मार्च महिन्यापासून एकाच पोलिस ठाण्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर करोना लागण होण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे पोलिसांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या दहापैकी दोघांनाच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, उर्वरीत आठ जणांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे. तर सरकारवाडा येथील 4 जण पॉझिटिव्ह आहेत.

नाशिक शहर पोलिस दलात करोनाचा प्रसार इतर ठिकाणाच्या तुलनेत तसा फारच हळुवार झाला. मात्र, आता करोना संसर्गाचे प्रमाण वाढते आहे.

विशेष म्हणजे यात सौम्य लक्षणे असलेली वा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा मोठा भरणा आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांसह मुख्यालय, पोलिस आयुक्तालय व इतर काही विभागांमधील कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली.

पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे थेट करोनाग्रस्तांचा संपर्क येण्याचा धोका असतो. तसेच पोलिसांना समुह पद्धतीने काम करावे लागते. अशाच एखाद्या ठिकाणी हा करोनाचा फैलावा झाला असावा.

दरम्यान, करोनामुळे रजेवर जाणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या हळुहळु वाढते असून, कामाच्या नियोजनाच्या दृष्टीने अधिकार्‍यांसाठी ही डोकेदुखी ठरते आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या