जागतिक क्षयरोग दिन विशेष पॉडकास्ट : काळजी घेतल्यास क्षयरोगावर मात करता येणे शक्य

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

जागतिक आरोग्य संघटनेकडून आजचा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो. क्षयरोगामुळे होणाऱ्या विनाशकारी, सामाजिक आणि आर्थिक परिणामांविषयी जनजागृती होणे हा या दिवसाचा उद्देश. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार क्षयरोगामुळे दररोज साधारण: ४००० लोक आपला जीव गमावत असतात.

क्षयरोगाची लक्षणे :

ताप येणे, मुख्यत्वे रात्री

भूक कमी लागणे

झटकन वजन कमी होणे

दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला

खोकताना थुंकीवाटे रक्त पडणे

छातीत दुखणे

अशक्तपणा व थकवा जाणवणे, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास त्रास होणे

टाळण्यासाठी काय करावे :

रोग्याने ताबडतोब स्वत:ला तपासून घेणे व काळजी घेणे

रोगप्रतिकारकशक्ती वाढवावी

तोंड झाकून खोकणे किंवा शिंकणे

वाटेल तेथे थुंकू नये

बदलत्या जीवनशैलीचा तरुणांना फटका : क्षयरोगाचे प्रमाण जरी कमी असले तरी ते धोकादायक आहे. तरुणांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण वाढले असून ही चिंताजनक बाब आहे. दोन दोन तासांनंतर काहीही न खाणे, पुरेसा आणि योग्य प्रमाणात आहार न घेणे, आहारात पालेभाज्या नसणे, सकाळी बाहेर जाताना काहीही खाऊन न जाणे दिवसभर बाहेरचे खाणे, मैदानावरचे खेळ न खेळणे यामुळे या तरुणांनमधील रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी झाली आहे. यामुळेच क्षयरोगाच्या विषाणूची बाधा लवकर होत असते.

डॉ. समीर चंद्रात्रे, क्षयरोग तज्ञ

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *