Friday, April 26, 2024
HomeUncategorizedनिघोजची श्री मळगंगा देवी

निघोजची श्री मळगंगा देवी

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध रांजणखळगे असलेल्या निघोज येथील मळगंगा मातेची…

अहमदनगर जिल्हयात पारनेर तालुक्यातील निघोज या गावामध्ये माता मळगंगा देवीचे वास्तव्य आहे. या देवीची एक मोठी महती आहे गावामध्ये मनाला आकर्षित करणार असं संगमरवरी दगडामधील मंदीराचे भव्य दिव्य बांधकाम केलेले आहे. गावापासून फक्त 2 कि.मी. अंतरावर 1990 च्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने ज्या ठिकाणाला वेगळे स्थान म्हणून मानाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नोंद घेतली ते ठिकाण म्हणजेच निघोजच्या कुकडी नदीवरील रांजणखळगे होय. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत कुंडमाऊली असे म्हणतात.

- Advertisement -

नवरात्री दरम्यान मळगंगा देवीचा मोठा उत्सव साजरा होता. येथे सकाळ संध्याकाळ आरती असते. सगळे गावकरी या उत्सवात सहभाग होऊन हा उत्सव पार पाडतात. अनेक भाविकजण येथे घटी बसतात त्यांच्या रहाण्याची खान पानाची व्यवस्था देवस्थाकडून केली जाते. उत्सवादरम्यान भजन, किर्तन, नामगजरही केला जातो. विजयादशमीला येथील नवरात्राची समाप्ती होते.

मळगंगा आणि रांजणखळगे यांचा धार्मिक व सांस्कृतिक बाबतीत जवळचा संबंध आहे. चैत्र महिन्यात मळगंगेची यात्रा भरते दोन दिवस चालणार्‍या या यात्रेस पंचक्रोशीतील भाविक एकत्र येऊन देवीचा उत्सव साजरा करतात. उत्सवात पालखीची मिरवणुक यात ढोल लेझीम ताशा व शोभिवंत दारूकाम आणि तन मन धनान एकरूप झालेले भक्तगण सर्व समुदायाला भाराऊन टाकतो या मिरवणुकीत देवीची प्रतिमा व घागरीच्या दर्शनासाठी भाविकांची धडपड चालु असते शेवटी मिरवणुकीनंतर ही घागर बारवेत विसर्जीत केली जाते. कुंडावर देवीचे एक मंदीर आहे मग यात्रा उत्सव तिकडे साजरा होतो. यात्रेच्या निमित्तानं निघोजची आर्थिक उलाढाल कोटीच्या घरात होते. यात्रेत पंचक्रोशीतील नव्हे तर जिल्हयातील सर्वच लोकाच सहभाग असतो. त्यामुळेच निघोज मळगंगेच्या यात्रेचा नावलौकिक खुप दुरवर पोहचला आहे.

निघोजचे जगप्रसिध्द रांजणखळगे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते.पावसाळयात खळखळणार पाणी अती सुंदर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणीवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात. शालेय अभ्यासक्रमाच्या भुगोल विषयात कुकडी नदीतील या खळग्यांचा खास उल्लेख असल्याने या ठिकाणाबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता दिसून येते. पुणे विदयापीठातील भुगर्भशास्त्र भुगोलशास्त्र व पर्यटनशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विदयार्थ्यी प्राध्यापक संशोधक येथे अनेकदा येऊन जातात खुप मोठया प्रमाणावर छायाचित्रण केले जाते. निघोजच्या धार्मिकबाबींचे वर्णन रेखाटणारा नुकताच प्रदर्शित झालेला कुंडमाऊली मळगंगा हा चित्रपट होय.असे हे निघोजचे धार्मिक व भौगोलिक अविष्कार खुप पहाण्यासारखे आहेत व ते पहावेतच ही संधी पर्यटकासाठी सोन्याचीच पर्वणी.

श्रोत्यांनो उद्या भेटू या अहमदनगरच्या सुप्रसिद्ध व अत्युच्च शिखरावर वसलेल्या कळसुबाई देवीच्या माहितीसह..

- Advertisment -

ताज्या बातम्या