कळसूबाई शिखरावरील कळसुबाई

कळसूबाई शिखरावरील कळसुबाई
कळसुबाई

अहमदनगर जिल्ह्यातील देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेत आपल्याला ओळख करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच टेकडी असणार्‍या कळसूबाई शिखरावर वसलेल्या श्री. कळसुबाईची मातेची...

शिखर स्वामिनी म्हणून नावाजलेली, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर वसलेली कळसुबाई. आदिवासींची कुलदेवता म्हणून कळसुबाईचा उल्लेख केला जातो कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे म्हणून त्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे देखील संबोधले जाते कळसुबाई शिखराची उंची ही वारी गावाच्या पायथ्यापासून 1646 मीटर इतकी उंच आहे. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये आहे. देवीचे मूळ घराणे हे इगतपुरी तालुक्यामध्ये आहे. इगतपुरी तालुक्यातील इंदोर याच्या शेंडे कुटुंबामध्ये देवीचा जन्म झाला अशी मान्यता आहे.

घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचव्या मान्यता आणि सातव्या माळेला कळसुबाई शिखरावर ती खूप गर्दी असते म्हणून या माळेला पाहुण्यांची माळ म्हणून ओळखले जाते. कळसूबाई शिखराच्या पायवाटेवर पहिल्या टप्प्यापासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सहा इंच उंच व पंचेचाळीस इंच इतक्या अरुंद अशा सुमारे बाराशे पायर्‍या तयार करण्यात आलेल्या आहेत तर ज्या ठिकाणी खूपच अवघड रस्ता आहेत व पायर्‍या करणे शक्य नाही अशा ठिकाणी पाचशे मीटरच्या अंतरावर नवीन शिडी लावून रेलिंग तयार करण्यात आले आहेत कळसुबाई श्रीदेवी खरेतर त्र्यंबकेश्वरापासून ते भीमाशंकरपर्यंतच्या आदिवासी जमातीच्या जनमताचे प्रतीक समजले जाते.

देवी चा जन्म हा जिल्हे आडनावाच्या ठाकर कुटुंबामध्ये झाला. परंतु सेने आडनावाच्या कोळी कुटुंबाला मुलबाळ नसल्यामुळे त्यांनी कळसूला दत्तक घेतले. शेंडे कुटुंबामध्ये जाण्याआधी कळसूने शेंडे कुटुंबाला दोन अटी घातल्या तिची पहिली अट म्हणजे मला कधीही चपला उचलायला सांगायच्या नाहीत व दुसरी अट म्हणजे मला खरकटे काढायला सांगायचे नाही. ज्या अटी शेंडे कुटुंबाला मान्य झाल्यावर ती त्यांच्याकडे किती यथावकाश वारीच्या खाडे कुटुंबातील अनुरूप मुलाबरोबर तिचा विवाह निश्चित झाला परंतु दत्तक देताना दिलेल्या अटी विसरून तिला घरी आलेल्या पाहुण्यांच्या चप्पल उचलायला व खरकटे काढावयास सांगितले गेले अटींचा भंग झाल्यावर संतापलेल्या कळसू ने शिखराचा रस्ता धरला क्षमायाचना करीत जेव्हा तिच्या मानलेला भाऊ तिला आडवा गेला तेव्हा अपमानाने संतापलेल्या कळसू ने त्याची शेंडी धरून त्याला उभा आडवा केला. रागाच्या भरात कळसुबाई शिखरावर या उंच शिखरावर येऊन बसली व तीच आज कळसुबाई म्हणून महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आणि जगातील ही काही प्रांतात प्रसिद्ध आहे.

नवरात्रीत कळसूबाई देवीची रोज नऊ दिवस पूजा असते नि त्या काळात तिथे येणार्‍या भाविकांची गर्दीही बरीच असते. संध्याकाळी अंधार पडल्यावरही आरतीसाठी वर मंदिरापर्यंत जाणारे बरेचजण असतात. शिवाय तेव्हा स्थानिक वस्तू, पूजासाहित्य वगरे विकणारेही मोठ़या संख्येने असतात. नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी उसळते. मुंबई, ठाणे, नाशिक, तसेच स्थानिक भाविक, गिर्यारोहक दर वर्षी नवरात्रोत्सवात हजेरी लावतात. दर वर्षी एक लाखाहून अधिक भाविक नवरात्रोत्सवात शिखरावर येत असतात.

श्रोत्यांनो गेल्या आठ दिवस सुरू असलेल्या देवीमातेचे प्रसिद्ध ठिकाणे या विशेष मालिकेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...

Related Stories

No stories found.