Podcast : आमच्या गप्पा : शेतकरी आणि ग्राहकांना जोडणारे ‘वेसाटोगो’

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक | दिनेश सोनवणे

केंद्र सरकारने नाशिकमधील ‘वेसाटोगो’ (Vesatogo) स्टार्टअपचा राष्ट्रीय नवउद्यमी पुरस्कार (National start up award) देऊन गौरव केला आहे. त्याचे निर्माते अक्षय दीक्षित (Akshay Dixit) यांच्याशी ‘देशदूत’चे प्रतिनिधी दिनेश सोनवणे (Dinesh Sonawane) यांनी साधलेला संवाद…..

स्टार्टअपच्या नावाची फोड करताना दीक्षित यांनी सांगितले, संस्कृतमध्ये वेसा (Vesa) म्हणजे लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी (Small farmer) आणि जापनीजमध्ये टोगो (Togo) म्हणजे एकात्मता किंवा एकजूट (Unity). आमची संस्था अल्पभूधारक शेतकऱ्यांची एकजूट करते.

उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक यामधील दुवा म्हणून काम करते. शेतकऱ्यांच्या बांधापासून मार्केटपर्यंत शेतमाल पोहोचविण्याची साखळी तयार करण्यात आली आहे.

संस्था सुरु होऊन चार वर्षे झाली. या चार वर्षात हजारो टन शेतमाल बाजारपेठ व निर्यातदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. जवळपास २० हजार शेतकरी संस्थेशी जोडले गेले आहेत. याद्वारे जवळपास ६५० कोटींची उलाढाल होत आहे.

‘वेसाटोगो’ने काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. शेतमाल खरेदी, बाजारपेठेची माहिती, वाहतूक व कृषी व्यवस्थापनासाठी एफपीओ मनेजमेंट सिस्टीम विकसित केली. (FPO Management System) ही सिस्टीम बनवताना अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांची देखील भेट घेतली होती. हळूहळू व्यापक स्तरावर काम करण्यासाठी चांगल्या सॉफ्टवेअरची गरज होती. तसे ते बनवले.

या सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, गट नंबर, प्लॉट नोंदणी, डिजिटल प्रोफाईल क्रिएशन, कापणीचे नियोजन, सद्यस्थिती, कापणी कधी करावी, मालाचा दर्जा, माल वाहतुकीसाठी किती आणि कोणत्या प्रकारची वाहने लागतील, गाडीचे लाईव्ह ट्रॅकिंग, किती पैसे द्यावे लागणार, माल परत आला तर काय करावे या सर्व गोष्टींचा त्यात अंतर्भाव केला गेला आहे.

ई-कॉमर्सचा प्लटफॉर्म (E-Commerce Platform) जोडण्यात आला आहे. यात शेवटच्या ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवू शकता त्याचे ट्रॅकिंग ठेवता येते. याचा थेट फायदा शेतकरी, निर्यातदार किंवा व्यावसायिकांना होत आहे.

यात माझ्यासहित सागनिका चक्रवर्ती, आशिष म्हाळणकर विभाग शेळके यांच्यासहित १५ सहकारी काम बघतात. विशेष म्हणजे सर्वांची पार्श्वभूमी शेती हीच आहे.

नियमित कामाबरोबरच डिस्क (Disq), टाटा मोटर्स (Tata Motors) व सह्याद्री फार्म्स (Sahyadry Farms) सोबत तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली. सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून ‘फार्म सेतू’ (Farm Setu) टेक्नोलॉजी अपवर काम सुरु आहे. कमीत कमी खर्चात हवामान केंद्र (Climate Station) बसवणार आहोत.

पुढे शेतमाल, त्याची काळजी, खते, औषधांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पुढील दोन महिन्यात बीटा व्हर्जन लॉन्च होईल. त्याची हळूहळू व्याप्ती वाढवणार आहोत. यापुढे सिस्टीम अधिक सक्षम करून शेतकरी कुठेही शेतात बसून माल विकू शकेल, भाव बघू शकेल अशी सुविधा उपलब्ध करायची आहे. शेतकरी स्मार्ट करणे हाही उद्देश आहे.

आम्ही एक व्हिजन समोर ठेवून काम करत आहोत. चांगलं काहीतरी करू पाहत आहोत. आम्हाला अनेक पुरस्कार मिळाले. ते यश सर्वांचे आहे. कारण सर्वांनी स्टार्टअप वर विश्वास ठेवून तंत्रज्ञान वापरले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *