
अकोले|प्रतिनिधी|Akole
देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे सर्व उद्योग व्यवसायाबरोबरच शेती व्यवसायही अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना आधार देण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा बँकेच्यावतीने निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी शेतकर्यांना तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी दैनिक सार्वमतशी बोलताना दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीमुळे सध्या मध्यम मुदतीच्या पिकांचे कर्ज थकलेले आहेत. यापूर्वी थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना कर्ज देण्यात येत नव्हते. मात्र यावर्षी अशा थकबाकीदार शेतकर्यांना देखील कर्जाची उपलब्धता करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात वर्ग नंबर दोनच्या असलेल्या जमिनीच्या भोगवटादारांना देखील यावर्षी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.