Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedव्यायाम आणि योग परस्परपूरक : गंधार मंडलिक

व्यायाम आणि योग परस्परपूरक : गंधार मंडलिक

देशदूत ‘आमच्या गप्पा‘

पाहुणे : गंधार मंडलिक, संचालक, योगविद्या गुरुकुल, नाशिक

- Advertisement -

विषय : मानवी जीवनात योगाचं महत्त्व

संचलन : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी

आजकाल लोक योगासनाला व्यायामच म्हणतात. टीव्हीवर वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात. पीटी, कसरत असे आपण त्याला म्हणतो. योगासने अशी नाहीत…

योगासने हा व्यायामाला पर्याय नाहीच. ‘हटयोग प्रदीपिके’तील श्लोकात सांगितल्याप्रमाणे युवक, स्त्रिया, प्रौढ, ज्येष्ठ अशा सर्वांनाच योगासनांचा फायदा होतो. व्यायाम आणि योग परस्परपूरक आहेत, अशा शब्दांत नाशिकच्या ‘योगविद्या गुरुकुल’चे संचालक गंधार मंडलिक यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

‘देशदूत डिजिटल’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात ‘मानवी जीवनात योगाचं महत्त्व’ या विषयावरील चर्चेत मंडलिक बोलत होते. योगासने आणि व्यायाम यातील फरकही मंडलिक यांनी स्पष्ट केला. जगभर योगाचा स्वीकार वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे.

परिस्थिती बदलत आहे. योगाचा स्वीकार ‘युनिव्हर्सल’ झाला आहे. योगाचे अनेक फायदे होतात. मानसिक स्वास्थ्य लाभते. चिंता, नैराश्य, मानसिक अडचणी असतील त्यात योगाचा खूप फायदा होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. योगामुळे कोणतेही प्रतिकूल परिणाम होत नाहीत. महागाच्या वस्तू आणाव्या लागत नाहीत. त्यामुळे योगाचा प्रसार खूप वाढला आहे, असे मंडलिक म्हणाले.

मानसिक स्वास्थ्यातून शारीरिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्यातून मानसिक स्वास्थ्य मिळते. योगासने मानसिक स्वास्थ्याचे महत्त्वाचे साधन आहे, असेही मंडलिक यांनी नमूद केले. वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी मंडलिक यांच्याशी संवाद साधला.

- Advertisment -

ताज्या बातम्या