Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमुद्द्याची गोष्ट : कशाला हव्या निवडणुका

मुद्द्याची गोष्ट : कशाला हव्या निवडणुका

राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका शुक्रवारी अपवाद वगळता शांततेत झाल्यात. आता उद्या दुपारपर्यंत निवडणुकींचे निकाल येतील आणि गावास नवीन कारभारी मिळेल. चला चर्चा करु निवडणुका या विषयावर या सहायक संपादक जितेंद्र झंवर यांचा पॉडकास्ट ‘मुद्याची गोष्ट’मध्ये…

खरंच लोकशाहीत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात का? लोकशाहीत निवडणुकांनाच महत्व आहे. त्याचाच हा सण आहे. मग बिनविरोध कशासाठी हव्यात या निवडणुका. लोकशाहीचा श्वास जर निवडणुका आहेत तर तोच आपण का काढून घेण्याचा प्रयत्न करतो? निवडणुका फक्त ग्रामपंचायतीच्याच का बिनविरोध कराव्यात.

- Advertisement -

मग आमदार, खासदार बिनविरोध निवडून द्या ना? मुख्यमंत्री, पंतप्रधानही बिनविरोध होतील. खर्च वाचेल. निवडणूक आयोगाची गरज नसेल. मुळात बिनविरोध निवडणुकींचा आग्रह धरणे म्हणजे एकहाती सत्ता सोपवणे नाही का? मग विरोधक नसतील तर गावातील प्रश्न, समस्यांवर चर्चा कशा होतील. ग्रामपंचायत निवडणूक ही राजकारणात करिअर घडवण्याचा पहिला टप्पा आहे.

तोच रद्द करुन पुढील वर्गात बसला तर पाया कच्चा राहणार नाही का? विलासराव देशमुख यांचासारखा मुख्यमंत्री ग्रामपंचायतीनेच राज्याला दिला.

यादी करण्यास गेलो तर अशी खूप मोठी यादी होईल, जे देशात व राज्यात ग्रामपंचायतीतून पुढे गेले आहे. आर्थिक प्रलोभने दाखवून निवडणुका बिनविरोध करण्यापेक्षा निवडणुकात घेतलेल्या बऱ्या. त्यामुळे उद्या देशाला चांगले नेतृत्व मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या