देशदूत ‘आमच्या गप्पा’ : कमी खर्चात कृषी पर्यटन केंद्र उभारणी शक्य - बोराडे

देशदूत ‘आमच्या गप्पा’ : कमी खर्चात कृषी पर्यटन केंद्र उभारणी शक्य - बोराडे

विषय : कृषी पर्यटन - शेतीपूरक नवा व्यवसाय (Agro Tourism)

सहभाग : ‘कृषिभूषण’ तुकाराम बोराडे (Tukaram Borade)

मुलाखत संचलन : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी Nashik

कृषी पर्यटन केंद्रासाठी ‘ऋण काढून सण’ करण्याची गरज नाही. फारसा खर्च न करताही शेतीवर उपलब्ध साधनसामुग्रीतून कृषी पर्यटन केंद्र सुरू करता येते. खर्च नियंत्रणात ठेऊन शेतीत अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करतात.

कृषी पर्यटन केंद्रालाही हाच नियम लागू होतो. या व्यवसायात येऊ इच्छिणार्‍यांनी हा दृष्टिकोन जरूर विचारात घ्यावा, असा आपुलकीचा सल्ला ‘कृषिभूषण’ पुरस्कार विजेते प्रयोगशील शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्रसंचालक तुकाराम बोराडे यांनी दिला.

दैनिक ‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात ‘कृषी पर्यटन : शेतीपूरक उद्योग-व्यवसाय’ या विषयावर बोराडे यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. महाराष्ट्रात आजमितीला 500 हून जास्त कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत आहेत. deshdoot our talks

कोकण भागात त्याचे प्रमाण मोठे आहे. नाशिक जिल्ह्यात आठ-दहा केंद्रे सुरू आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र चालवणे किफायतशीर आहे. मात्र त्यासाठी जास्त आर्थिक गुंतवणूक करणे टाळणे चांगले.

एखादे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाल्यावर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतमालाची विक्री आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होते. येणार्‍या पाहुण्यांबाबत आपुलकी आणि बोलण्यात गोडवा व्यवसायात सर्वात महत्त्वाचा आहे. सध्याचा संकटकाळ निवळल्यानंतर नव्या उत्साहाने कृषी पर्यटन सेवा सुरू करण्यास आम्ही उत्सूक आहोत, असेही बोराडे यांनी सांगितले.

(तुकाराम बोराडे यांची सविस्तर मुलाखत ऐकण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com