कवी प्रकाश होळकर
कवी प्रकाश होळकर|Poet Prakash Holkar
आमच्या गप्पा

देशदूत गप्पा : कवितेतून प्रेम, निसर्ग प्रतिबिंबित व्हावा : प्रकाश होळकर

N. V. Nikale

N. V. Nikale

विषय : माझा काव्यलेखन प्रवास

पाहुणे : प्रख्यात कवी आणि चित्रपट गीतकार प्रकाश होळकर

संचलन : एन. व्ही. निकाळे

नाशिक । विशेष प्रतिनिधी

ग्रामीण भागातील अनेक तरुण कवी मराठी साहित्यात पुढे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाड्यातील नवे कवी त्यात आहेत. मात्र अनेक कवितांमधून ग्रामीण-ग्रामीण म्हणून दु:खाचंच गाणं आळवलं जातं.

ग्रामीण जीवनाला सुखाच्या किनार आहेत की नाहीत? शेतातील आनंद, कुटुंबातली सुख-दु:खं, प्रेम, निसर्ग त्यात आला पाहिजे.

तरीसुद्धा तरुण कवी खरेच चांगले लिहित आहेत. नवनव्या प्रतिमा त्यांच्या कवितांतून येत आहेत. ते लक्ष वेधून घेत आहेत. नवकवींनी बाहेरचे साहित्यही वाचवले पाहिजे, असे मनोगत महाराष्ट्रातील प्रख्यात कवी आणि चित्रपट गीतकार प्रकाश होळकर यांनी व्यक्त केेले.

‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात कवी होळकर सहभागी झाले. त्यांच्याशी झालेला गप्पांचा हा कार्यक्रम खूप रंगला आणि तेवढाच रंजकही ठरला. आपल्या शेजारी केरळ आहे. कर्नाटक आहे. गुजरात आहे.

तेथेही शेतीत काम करणारे, लिहिणारे कवी आहेत. ते काय म्हणतात? काय लिहितात? कोणती सुख-दु:खं मांडतात? त्यांच्या काव्यात कोणत्या प्रतिमा येतात? वापरल्या जातात? हे जाणून घेण्यासाठी तेथील अनुवादीत साहित्य तरुण कवींनी वाचावे. म्हणजे त्यांचे विचार कळतील. त्यातून आपली शब्दांची समृद्धीसुद्धा वाढेल, असे होळकर म्हणाले.

गप्पांच्या शेवटी ‘माझे आभाळ तुला घे, तुझे आभाळ मला...’ ही प्रसिद्ध कविता कवी होळकर यांनी गाऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली. गप्पांचे संचलन वृत्तसंपादक एन. व्ही. निकाळे यांनी केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com