Monday, April 29, 2024
HomeUncategorizedकरोना रुग्णांसाठी युवीची हेल्पिंग ड्राइव्ह

करोना रुग्णांसाठी युवीची हेल्पिंग ड्राइव्ह

नाशिक I nashik

भारतात करोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन आता समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींनी मदतीसाठी पुढे येत आहेत. यात भारतीय संघाचा फलंदाज युवराजसिंगने करोना रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. देशात उपलब्ध असणाऱ्या विविध हॉस्पिटल्समध्ये साधारणपणे १००० बेड्स वाढवण्याचा निर्धार युवराजने केला आहे…

- Advertisement -

करोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. ही देशाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. मात्र तज्ञ मंडळींनी भारतात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढली की, रुग्णांना उपचारासाठी बेड्स अपुऱ्या पडतात. अशा परिस्थितीत युवराजने १००० बेड्स वाढवण्याचे निश्चित केले आहे.

त्याच्या ‘यू व्ही कॅन’ या संस्थेकडून हे सर्व प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये युवराजच्या संस्थेनं पाहिले पाऊल उचलले आहे. युवराजने इंदूरमधील एजीएम रुग्णालयामध्ये पत्र पाठवून १०० बेड्स वाढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रुग्णालयाने युवराजने केलेल्या मदतीचे अभिनंदन करताना परवानगी देऊ केली आहे. आगामी २०-३० दिवसांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी १०० बेड्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व बेड्स ऑक्सिजन बेड्स असतील व १०% बेड्स व्हेंटिलेटर बेड्स असतील.

“करोना महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांचा जीव गमावला आहे. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर अत्यावश्यक सुविधांसाठी अनेकांना कठीण प्रसंगांचा सामना करताना पाहिले आहे. यावरून मी खूप अस्वस्थ झालो असून, आपण आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या लोकांना तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीचा हात पुढे केला पाहिजे,” असे युवराजने म्हटले आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या