‘युट्यूब गर्ल’ बिंदास काव्या बेपत्ता ; पोलिसांकडून शोधाशोध

‘युट्यूब गर्ल’ बिंदास काव्या बेपत्ता ; पोलिसांकडून शोधाशोध

औरंगाबाद - aurangabad

प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya) ही मुलगी अचानक बेपत्ता (missing) झाली आहे. काल दुपारपासून ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी पोलीस (police) ठाण्यात दिली आहे. मात्र अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. मुलगी कुठेही दिसल्यास संपर्क साधण्याचं आवाहन आई वडिलांनी केले आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून यूट्यूबर बेपत्ता आहे. ती घरी न आल्यानं कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रांकडे तिची विचारपूस केली. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी आज छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. छावणी पोलीस आणि सायबर क्राईम विभाग तिचा शोध घेत आहे. पडेगावात राहणाऱ्या यूट्यूबरचे ४३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या अनेक व्हिडीओंना हजारो लाईक्स मिळतात. प्रसिद्ध यूट्यूबवर अल्पवयीन आहे. २४ तास उलटून गेल्यानंतर तिचा शोध न लागल्यानं आई वडील चिंतेत आहेत. आम्हाला कोणीच मदत करत नाहीए. आमची मुलगी कुठे दिसली तर कृपया संपर्क साधा. आमच्या मुलीला कोणी ओळखणार नाही, असं होऊ शकत नाही. आम्हाला वेळीच मदत करा. अन्यथा खूप उशिरा होईल, असं आवाहन तिच्या आई वडिलांनी केले.

बिंदास काव्या ही युट्युब सेलिब्रिटी (Youtube celebrities) कालपासून गायब आहे. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बिंदास काव्या ही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार काव्य ही रेल्वेने बाहेरगावी गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. अभ्यासाच्या कारणावरून तिचे आणि आई वडिलांचे भांडण झाले. आई-वडिलांनी तिचा मोबाईल घेतल्याने ती रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कमी वयात काव्याने युट्यूबवर यशस्वी भरारी घेतली आहे.

याबाबत या मुलीच्या आईने एक एकोणावीस मिनिटाचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, ज्यात आमची मुलगी कधीही एकटी राहत नाही. एवढ्या वेळ ती एकटी राहू शकत नाही. त्यामुळे तिला कुठेही पाहिले तर आम्हाला माहिती कळवा असे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com