…म्हणून यूट्यूबने केले 10 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

यूट्यूब (Youtube) हे अतिशय लोकप्रिय कंटेट ॲप (Content App) आहे. यू-ट्यूबच्या माध्यमातून लाखो युजर्स माहितीपर, विश्लेषणात्मक व्हिडिओ (Video) दररोज पाहत असतात. नुकतेच यूट्यूबने (YouTube) आपल्या प्लॅटफॉर्मवरुन १० लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट (Videos deleted) करण्यात आले आहेत…

करोना (Corona) महामारी संबंधित माहिती व्हायरल करणारे व्हिडिओ यूट्यूबवरून हटवण्यात आले आहे. हे व्हिडिओ (Video) कंपनीच्या नियमानुसार हटवण्यात आले असल्याची माहिती कंपनीचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर नील मोहन (Neal Mohan) यांनी दिली.

ते म्हणाले की, फेब्रुवारी 2020 पासून आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरुन (Platform) करोना संबंधित एक मिलियनहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित झाली होती. करोनाच्या उपचाराबद्दल खोटी माहिती दिली जात होती.

चुकीची माहिती देणारे व्हिडीओ आम्ही हटवण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहोत. चुकीची माहिती देणारे व्हिडिओ हटवणे अत्यंत गरजेचे आहे. असे केल्याने युजर्सला योग्य माहिती मिळणार आहे, असे यूट्यूबचे (YouTube) म्हणणे आहे.