<p><strong>मलकापूर - Malkapur</strong></p><p>येथील शिवाजी नगरात ४२ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी दुपारी उघडकीस आली. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.</p>.<p>काकडा आरतीत "हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची...असे सुमधुर गान करणाऱ्या विठ्ठल बबनराव आगलावे (वय ४२) यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अज्ञाप अस्पष्ट आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर शिवाजी नगरात शोककळा पसरली आहे.</p>