Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedवेरूळ लेणीसमोर योग दिन असा झाला साजरा

वेरूळ लेणीसमोर योग दिन असा झाला साजरा

औरंगाबाद – aurangabad

जागतिक वारसा स्थळ असलेल्या (Ellora Caves) वेरूळ लेण्यांसमोर (Indian Army) भारतीय सैन्याच्या अग्नीबाज विभागांतर्गत स्योर स्विफ्ट स्ट्राइकर्स ब्रिगेडद्वारे स्वर्णिम विजय वर्षानिमित्त भारतीय सैनिकांनी आठवा जागतिक योग दिवस (World Yoga Day) योगासने करत उत्साहात साजरा केला. योगाचे महत्त्व आणि त्याचे लाभ याबाबत जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

मानवतेसाठी योग अशी यावर्षीची थीम आहे. यावर आधारित भारतीय जवान, त्यांचे कुटुंबीय, नागरिक, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, केंद्रीय पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आदी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आयोजित या कार्यक्रमात एकूण 600 योगप्रेमींनी योगासने करून योग दिवस साजरा झाला. तसेच केंद्रीय विद्यालयाच्या 200 विद्यार्थ्यांनीही योग कार्यक्रमात योगासने केली.

जीवनात निरोगी रहायचे असेल तर योगा करणे आवश्यक असल्याचे या कार्यक्रमाद्वारे संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 6 जून ते 19 जूनपर्यंत योग कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आयुष संकेतस्थळावर उपलब्ध व्हिडिओ व इतर मुक्त सामुग्रीचा योगासनाबद्दल जागरूकतेसाठी उपयोग करण्यात आला. सैन्याद्वारा आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाने उत्साहात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सपत्निक सहभाग घेत योगासने केली. त्यांनी यावेळी योगा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्नल मनीष तिवारी यांनी केले. सूत्रसंचालन आरजे तेजा यांनी केले. आभार 97, तोफखाना ब्रिगेड, मुख्यालयाचे कार्यवाहक कमांडर कर्नल महावीर सिंग यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या