'मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे' होणार!

रस्त्यांचे खोदकाम टळणार 
'मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेस वे' होणार!

औरंगाबाद - aurangabad

शहरात विविध कंपन्यांचे केबल टाकणे, गॅस लाईन (Gas line) टाकण्यासाठी वारंवार रस्त्याचे खोदकाम केले जाते. त्यामुळे महापालिकेचे (Municipal Corporation) कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ही वारंवार होणारी रस्त्यांची तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एक्स्प्रेसवे (Multi-utility underground expressway) टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान (Prime Minister) गतिशक्ती अभियानाअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळवता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू असून सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च असेल, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय (Municipal Administrator Astik Kumar Pandey) यांनी सांगितले.

शहरात सध्या दोन प्रभागांत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला खोदकाम केले जात आहे. तसेच बीएसएनएल, जिओ यासह विविध मोबाईल कंपन्यांतर्फे शहरात लाईन टाकल्या जातात. त्यासाठी महापालिका संबंधित कंपनीकडून पैसे घेते. पण रस्त्यांचे झालेले नुकसान मोठे असते. रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी मल्टी युटीलिटी अंडर ग्राऊंड एवस्प्रेस वेची शहरात गरज आहे. मात्र, त्यासाठी मोठा निधी लागणार आहे.

पंतप्रधान गतिशक्ती अभियानाअंतर्गत यासाठी निधी मिळविता येईल का?, यासाठी आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) या जागतिक बँकेशी संलग्न असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा झाल्याचे पाण्डेय यांनी सांगितले. ही संस्था कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महापालिकेला मदत करणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com