धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे

प्रस्तावित टोल प्लाझासाठी जागेचीही पाहणी
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार्‍या 124 किलोमीटर लांबीच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग-52 (जुना रा.म.211) प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत 10 टक्के शिल्लक राहिलेले काम जून अखेरीस पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवरच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या कामाची पाहणी केली. कोरोना संसर्गाची खबरदारी घेत वेळेत व गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारास केल्या.

पाहणीदरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, प्रबंधक (तांत्रिक) महेश पाटील, शाखा अभियंता राहुल पाटील, प्राधिकृत सल्लागार भागवत म्हस्के, एल ण्ड टी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सूर्या राव यांनी या कामाची माहिती जिल्हाधिकार्‍यांसमोर सादर केली.

आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून जूनअखेरीस काम पूर्णत्वास नेणार असल्याचे प्रकल्प अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकार्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग-52 वरील करोडी येथे प्रस्तावित टोल प्लाझासाठी संपादित जागेचीही पाहणी केली. टोल प्लाझावर वाहनधारकांसाठी स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, फास्ट टँगसाठीची सुविधा व इतर आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद ते करोडी या 30 किमोमीटर (खर्च 513 कोटी रुपये) औरंगाबाद बाह्य वळण रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील अडीअडचणी जाणून घेत ही कामे त्वरीत पूर्ण करुन वाहतूक सुरू करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले. या चौपदरीकरणाचे काम मे.एल अ‍ॅण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत अंतिम टप्प्यात आहे. तर मुरमा ते औरंगाबाद (38.00 कि.मी.) व करोडी ते तेलवाडी (56.00 कि.मी.) असे एकूण 94 कि.मी. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काळे यांनी यावेळी दिली.

औरंगाबाद (करोडी ते शिर्डी) या 80 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची रुंदी 7 मीटरवरुन 10 मीटर करण्यात येणार आहे. त्यासाठीची जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अतिरिक्त भूसंपादनाची आवश्यकता नाही. या रुंदीकरणासाठीचा डीपीआर त्वरीत बनवून सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com