जल जीवन मिशनचे काम जोमात!

३२४ गावांचे सर्व्हेक्षण
जल जीवन मिशनचे काम जोमात!

औरंगाबाद - aurangabad

गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी (water) पोहचविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या जल जीवन मिशनने (Water Life Mission) जिल्ह्यात वेग घेतला आहे. जिल्ह्यातील ३२४ गावांच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, यापैकी २०१ गावांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती (Chief Executive Officer) मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे (Nilesh Gatne) यांनी दिली.

'हर घर नल से जल' या उद्देशाने जिल्ह्यात जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार २४५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यातील ७५२ गावांचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. यापैकी ७०९ गावांच्या प्रकल्प अहवालाला मंजुरीही देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३२४ गावांतील कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून, २०१ गावांच्या कामांची निविदा अंतिम होऊन संबंधितांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत.

जल जीवन मिशनअंतर्गत कामांना गती देण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाला दिले आहेत. महिनाभरात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त कामांचे टेंडर होतील. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे गटणे म्हणाले.

Related Stories

No stories found.