Saturday, April 27, 2024
HomeUncategorized'...लोकांना कशाला वाईन पाजता!'

‘…लोकांना कशाला वाईन पाजता!’

औरंगाबाद (Aurangabad)

राज्य सरकारने वाईन (wine) विक्रीबाबत घेतलेल्या निर्णयावरून केंद्रीय सामजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले (Minister of State Ramdas Athavale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतः दारू न पिणारे उद्धव ठाकरे जनतेला वाईन (wine) का पाजताहेत असा खोचक टोला आठवले यांनी लगावला आहे. दोन दिवसीय औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असलेले आठवले वाळूज येथील सभेत बोलत होते.

- Advertisement -

यापुढे किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये सुध्दा वाईन विक्री करण्यात येणार असल्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. तर याच निर्णयावर बोलताना आठवले म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) स्वतः दारू घेत नाहीत, मग जनतेला वाइन पाजण्यासाठी सहज का उपलब्ध करून देत आहेत, असा सवाल उपस्थित करत आठवले यांनी आपल्या मिश्कील शैलीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

औरंगाबाद (Aurangabad) येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सुद्धा टीका केली. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ऐक्य आम्हाला मान्य नाही ही भूमिका सोडली पाहिजे. ऐक्याचा विषय मी मांडलेला आहे. पण, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे भेटण्यासाठी वेळ देतील अस वाटत नाही. तर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या शिवाय ऐक्य शक्य नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) गांभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे, असं आठवले म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या