लस न घेता प्रमाणपत्र घेणारे 16 जण कोण?

सायबर पोलिसांची घेणार मदत
लस न घेता प्रमाणपत्र घेणारे 16 जण कोण?

औरंगाबाद - Aurangabad

कोरोना (corona) प्रतिबंधक लस न घेताच साईड हॅक करून एकाच कुटुंबातील सोळा जणांची नावे वेबसाइटमध्ये (Website) घुसवल्याचा प्रकार महापालिकेच्या डीकेएमएम महाविद्यालयाच्या (DKMM College) केंद्रावर घडला आहे. मात्र दोन आठवड्यानंतरही ते सोळाजण नेमके कोण? हे पालिकेच्या तपासातून समोर आलेले नाही. त्यामुळे आता (police) पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतले आहे. पोलिसांनी कोविन अ‍ॅपच्य सॉफ्टवेअरची माहिती पालिकेकडून मागविली आहे. यासाठी पालिकेने राज्य शासनाला पत्र दिले असून शासनाकडून माहिती मिळताच ती पोलिसांना दिली जाईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा (Medical Officer Dr.Of the Persian circle) यांनी स्पष्ट केले.

दोन आठवड्यापूर्वी 29 ऑगस्ट रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची वेबसाइट हॅक त्यात 16 जणांची नावे घुसवल्याचा प्रकार पालिकेच्या डीकेएमएम महाविद्यालयातील लसीकरण केंद्रावर घडल्याचे समोर आले. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी तीन आरोग्य अधिकार्‍यांची समिती तयार केली होती.

यात डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनिषा भोंडवे, हेमंत राठोड यांच्यासह डॉ. मंडलेचा यांनी देखील लसीकरण केंद्रावर जाऊन तेथील कर्मचार्‍यांची प्रत्यक्ष संवाद साधून चौकशी केली. मात्र ही गडबड कोणी केली? हे अद्याप निष्पन्न झाले नाही. त्यामुळे पालिकेने बेगमपूरा पोलिस ठाण्यातही तक्रार दिली. त्यावर आता पोलिसांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून वेबसाइटच्या सॉफ्टवेअरची व आयपी पत्त्याची माहिती द्या, अशी सूचना केली आहे. त्यानुसार या पत्राची प्रत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला पालिकेने पाठवली आहे. राज्य शासनाकडून परवानगीसह माहिती प्राप्त होताच ती पोलिसांना दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

पालिकेने याप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यात आरोपींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांची मदत घ्यावी, अशी शिफारस केली आहे. त्यानुसार लवकरच सायबर पोलिसांकडे देखील तक्रार केली जाणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com