Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedWhatsApp ने 20 लाख भारतीयांचे अकाऊंट्स का केले बॅन? पाहा इथे

WhatsApp ने 20 लाख भारतीयांचे अकाऊंट्स का केले बॅन? पाहा इथे

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) 20 लाख भारतीयांच्या अकाऊंट्सवर (Accounts of Indians) नुकतीच बंदी (banned) घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडे मागील काही कालावधीत 345 तक्रारी आल्या आहेत. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात (Compliance Report) याबाबत माहिती देण्यात आली आहे….

- Advertisement -

नव्या आयटी नियमांनुसार (New IT Rules) हा रिपोर्ट प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नव्या आयटी नियमानुसार 50 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेल्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला (Social Media Platform) मासिक अहवाल (Monthly report) प्रसिद्ध करावे लागणार आहेत. या अहवालात कंपनीला मिळालेल्या तक्रारी आणि त्या तक्रारींवर काय कारवाई झाली या उल्लेख करणे आवश्यक आहे.

कोणत्याही अकाउंटमधून सेंड केलेले अनावश्यक व हानिकारक मेसेजेस रोखण्याचा आमचा उद्देश आहे. असे मेसेजेस पाठविणाऱ्या अकाऊंट्सचा कंपनीने शोध घेतला आहे.

15 मे ते 15 जून या काळात भारतातील 20 लाख खात्यांवर या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असे व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने सांगितले आहे.

कुठल्याही व्हॉट्सअ‍ॅपने युझरने कंपनीच्या धोरणांचे उल्लंघन केले अथवा अश्लील, बेकायदेशीर, धमकावणारे, भीतीदायक आणि द्वेषपूर्ण मेसेजेस पाठवले तर त्याच्या अकाउंटवर बंदी (Account banned) घालण्यात येते.

ही कारवाई टाळण्यासाठी कंपनीच्या नियमांचे पालन करावे, तसेच कुठलेही अनावश्यक व हानिकारक मेसेजेस पाठवू नयेत, असेदेखील व्हॉट्सअपने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या