पश्चिम वाहिन्या नद्याचे पाणी गोदावरीत आणणार!

मुख्य अभियंता विजय घोगरे यांचा संकल्प 
पश्चिम वाहिन्या नद्याचे पाणी गोदावरीत आणणार!

औरंगाबाद- Aurangabad

मराठवाड्याची पाण्याची तहाण भागवण्यासाठी राज्य शासनाने पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पार-गोदावरी नदी जोड प्रकल्प राबविणार असल्याचे मत जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे Vijay Ghogre, Chief Engineer, Water Resources Department यांनी व्यक्त केले. रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

विजय घोगरे यांची ठाणे येथून अधीक्षक अभियंतपदावरून औरंगाबादेत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंतापदी पदोन्नतीने बदली झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मराठवाड्यात कृष्णा-मराठवाडा, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना (टप्पा 2) या सारखे महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. ते पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहेल.

कृष्णा खोऱ्याचे पाणी 2023 पर्यंत आणण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील Water Resources Minister Jayant Patil यांनी उस्मानाबादच्या दौऱ्यात दिले होते. त्यानुसार बोगदा, उपसा सिंचन योजनेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे घोगरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com