Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादकरांना 'मास्क'चे वावडे!

औरंगाबादकरांना ‘मास्क’चे वावडे!

औरंगाबाद – Aurangaad

‘मास्क घाला, कोरोना संसर्ग टाळा’, असे आवाहन केले जात असताना विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच आहे. कोरोना संसर्गाचे गांभीर्य नसलेल्या व्यक्ती शहरभर राजरोसपणे विनामास्क फिरत आहे. गेल्या दहा दिवसांत अशा १२०५ व्यक्तींवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. गेल्या दहा दिवसांत १,९४१ बाधित रुग्णांची भर पडली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेल्यांची संख्याही वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे, त्याच प्रमाणे सुरक्षित वावर आणि सॅनिटायझरचा वापरही आवश्यक आहे असे शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार सांगितले जात आहे, पण याकडे काही व्यक्ती दुर्लक्ष करताना दिसून येतात.

विनामास्क फिरण्याकडे लोकांचा कल दिसून येतो. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून पालिकेतर्फे ही कारवाई केली जात आहे. आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कठोरपणे कारवाई करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. २० ते २८ फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या काळात तब्बल १२०५ नागरिकांवर मास्क न घातल्याबद्दल प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि सुमारे पाच लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १० दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता अन्य ८ दिवस विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या शंभरच्या पुढेच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या