Thursday, May 9, 2024
HomeUncategorizedट्रान्सफार्मरमध्ये घुसली 'पाल'; पंपिंग स्टेशन ठप्प

ट्रान्सफार्मरमध्ये घुसली ‘पाल’; पंपिंग स्टेशन ठप्प

औरंगाबाद – aurangabad

महापालिकेच्या (Municipal Corporation) फारोळा येथील जलशुद्धीकरण (Water Purification Center) केंद्रात काल दुपारी अचानक ट्रान्सफॉर्मर (Transformers) मध्ये मोठा बिघाड झाला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. काल सायंकाळी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्यात येणार होता तो झाला नाही. आजही अर्ध्याहून अधिक शहराला पाणीपुरवठा होणार नाही. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

- Advertisement -

औरंगाबाद पाणी पुरवठा ५६ व १०० दलली योजनेवरील फारोळा जलशुद्धीकरण केंद्र येथील जुने व नदीन पंपगृहाच्या विद्युत पुरवण्यात अचानक विधाड होऊन काल ७ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता दोन्ही पंपगृहातील संपूर्ण पंपिंग बंद झाली. सदरील बिघाड हा नवीन फारोळा पंपगृहात असल्याचे निदर्शनास आल्यावर जुने फारोळा पंपगृहाची पंपिंग बायपास व्यवस्थेद्वारे दुपारी १२:१५ वाजता पुर्ववत सुरू करण्यात आली.

यानंतर नवीन फारोळा पंपगृहाच्या विद्युत उपकेंद्रातील २००० के. व्ही. ए. क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर सेट क्र. ३ चे तीन्ही डी.ओ.शॉर्ट झाल्याचे आढळल्याने यंत्रणेतील दोष निवारणासाठी कार्यरत तिन्ही ट्रान्सफॉर्मर व पंपगृहातील मुख्य पॅनल तपासले असता इनकमर क्र. २ मध्ये पाल शिरुन फेज फेज टु फेज कॉन्टैक्ट होऊन सदरील बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले. करीता नवीन फारोळा पंपगृहातील संपूर्ण पंपिंग पुर्ववत करण्यासाठी मुख्य पॅनलमध्ये आवश्यक बदल करून सायंकाळी ७:३५ वाजता नवीन फारोळा पंपगृहातील एक पंप सुरु करण्यात आला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा चे वेळापत्रक एका दिवसाने पुढे ढकलण्यात आले. शहराच्या ज्या भागात काल पाणीपुरवठा होणार होता, त्या भागात आज पाणी पुरवठा होईल.

ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या काळात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ढोरकिन येथील पाण्याची गळती बंद करण्याचे काम केले. याच ठिकाणचा एक एअर व्हॉल्व्हदेखील बदलण्यात आला. करीता नागरिकांना होणाऱ्या गैरसोईबाबत दिलगीरी व्यक्त करण्यात येते. उपरोक्त परिस्थिती पाहता महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या