Monday, April 29, 2024
HomeUncategorizedकचरा प्रक्रिया प्रकल्प संकटात

कचरा प्रक्रिया प्रकल्प संकटात

औरंगाबाद – aurangabad

पुरेशा प्रमाणात (Hotel) हॉटेल वेस्ट मिळत नसल्यामुळे (Aurangabad Municipality) औरंगाबाद महापालिकेचा कांचनवाडी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प संकटात सापडला आहे. या प्रकल्पासाठी रोज २५ टन ओला कचरा लागतो आणि तो उपलब्ध करून ची जबाबदारी महापालिकेवर आहे. परंतु, शहरातील हॉटेल्समधून अपेक्षित अशा प्रमाणात ओला कचरा संकलित होत नसल्याने सदरील प्रक्रिया प्रकल्प कसा चालवायचा हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

राज्य शासनाने (State Govt.) उपलब्ध करून दिलेल्या निधीतून महापालिकेने शहराच्या चार दिशांना चार कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी चिकलठाण, पडेगाव आणि हर्सूल येथील प्रकल्पांमध्ये कचऱ्यापासून खत निमिंतीचे काम करण्याचे ठरविण्यात आले. चिकलठाणा आणि पडेगाव येथील प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या दोन्हीही ठिकाणी रोज सरासरी तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. हर्सूलच्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून दिवाळीपर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होईल असे मानले जात आहे. चौथा प्रकल्प कांचनवाडी येथे उभारण्यात आला आहे. कांचनवाडी येथील प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून (प्रामुख्याने हॉटेल वेस्ट) गॅस निर्मिती आणि गॅसपासून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित कंत्राटदार कंपनीने हा प्रकल्प उभा केला; पण पुरेशा प्रमाणात ओला कचराच मिळत नसल्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प अपेक्षित क्षमतेने सुरू ठेवायचा असेल तर रोज २५ टन ओल्या कचर्‍याची गरज आहे. प्रकल्पासाठी ओला कचग मिळवून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु महापालिकेला रोज एवढा कचरा प्रकल्पासाठी उपलब्ध करून देणे शक्‍य होत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या