
औरंगाबाद- Aurangabad
सध्या राज्यात हवामान कोरडे झाले असून, तापमानात अंशत: वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा अद्याप कायम आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात कुठे होणार गारपीट?
राज्यातील खान्देश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आगामी 2 दिवस दाट धुके राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामानात काहीसा बदल होणार आहे.
21 आणि 22 जानेवारीला खान्देशासह विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये खान्देशमध्ये थंडी काहीशी अधिक, तर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात हळूहळू ढगाळ वातावरण निवळण्याचीही अपेक्षा आहे. तसेच या काळात शेकऱ्यानी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याने दिली आहे.