सावधान : दोन दिवस मोठ्या पावसाचे

नागरिकांनी सावधगिरी बाळगावी
सावधान : दोन दिवस मोठ्या पावसाचे

औरंगाबाद - Aurangabad

हवामान विभागाने 26 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात दि. 27 व 28 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन (District Disaster Management Department) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय (Collector's Office) कक्षाने केले आहे.

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 27 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत औरंगाबाद विभागातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची सुचना निर्गमित केली आहे.

ज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानुसार दि. 27 ते 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे

Related Stories

No stories found.