व्यवसाय शिक्षक महासंघातर्फे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

व्यवसाय शिक्षक महासंघातर्फे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

व्यवसाय शिक्षक महासंघातर्फे (vocational teachers association) दि. २८ जूनपासून मुंबई येथील आझाद मैदानावर (azad maidan) बेमुदत उपोषण (Agitation) केले जाणार आहे...

राज्यात २०१५ पासून माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम (Vocational Course) समग्र शिक्षा अभियान मुंबई अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. सुमारे ५५० पेक्षा जास्त शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू असून प्रत्येक शाळेत दोन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहेत.

शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती खासगी कंपन्यांमार्फत करण्यात आली. या शिक्षकांना २०१८ पासून १० महिन्यांचेच मानधन दिले जाते. २०२० मध्ये मे ते डिसेंबर २०२० पर्यंत कोणत्याही प्रकारचे नियुक्त आदेश न देता कोरोना महामारीमध्ये बेरोजगार करून मानधनापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांना प्रलंबित मानधन देऊन दिलासा द्यावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

उपोषणाला महासंघाचे अध्यक्ष शोभराज खोंडे (Sobhraj Khonde), महासचिव मंगेश जाधव (Mangesh Jadhav), कोषाध्यक्ष अनुकेश मातकर (Anukesh Matkar) यांच्यासह राज्यभरातील शिक्षक सहभागी होणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com