Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमोबाईल पाहू नको म्हटल्याने मुलाने सोडले घर

मोबाईल पाहू नको म्हटल्याने मुलाने सोडले घर

शेगाव-दिपक सुरोसे Shegaon

मोबाईल (Mobile) पाहू नको असे वडिलांनी म्हटल्याने राग आलेल्या मुलाने घर सोडून तो निघून गेल्याची घटना काही दिवसापूर्वी जळगाव (jalgaon) खान्देश येथे घडली. त्यामुळे त्याचे वडिलांनी संबंधित पोलीस (police) स्टेशनमध्ये मुलगा बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली यावरून जळगाव खान्देश पोलिसांनी गु र.न 279/22 कलम 363 भादवी दाखल करून तपास सुरू केला होत. परंतु 9 सप्टेंबर रोजी पंधरा वर्षाचा हा मुलगा शेगाव येथील रेल्वेस्थानकावर मिळून आला.

पालकांनी मोबाईल पहाणाऱ्या आपल्या लहान मुलांना मोबाईल पासून हळूहळू दूर करून त्यांना विश्वासात घेऊन वेळ देऊन मोबाईलची सवय कमी करावी जेणे करून असे प्रकार घडणार नाहीत त्यास आळा बसेल.

- Advertisement -

– पी.बी.मगर, ठाणेदार लोहमार्ग पोलीस स्टेशन, शेगाव

येथील रेल्वेस्थानक (railway station) प्लॅटफॉर्म क्र 2 वर कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे पोलीस (Railway Police) हेडकॉन्स्टेबल विजय पल्हाडे यांना 9 सप्टेंबर रोजी आढळून आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने सुमित महेंद्र काळे वय पंधरा वर्षे रा.रवीकिरण पार्क पिपराळा शिवार जळगाव खान्देश असे नाव व पत्ता सांगितला. त्यामुळे शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन मार्फत जळगाव खान्देश पोलिसांची संपर्क साधून या मुलाचे वडिलांशी संपर्क साधण्यात आला.

त्यांना शेगावला बोलवून येथील रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये सदर मुलगा त्याचे वडील महेंद्र काळे यांचे ताब्यात देण्यात आला पोलिसांच्या सतर्कतेमुळे घर सोडून आलेला हा मुलगा पालकांना सुखरूप मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. लोहमार्ग पो स्टे चे ठाणेदार पी. बी.मगर यांचे मार्गदर्शनात पोहेकॉ विजय पल्हाडे, गजानन वैतकार, संजय चव्हाण महिला पोलीस हवालदार रेखा वानखडे यांनी ही महत्वपुर्ण कामगिरी बजावली.

- Advertisment -

ताज्या बातम्या