औरंगाबादमध्ये सतर्कता : महापालिकेने मागवल्या ६५ हजार लसी

औरंगाबादमध्ये सतर्कता : महापालिकेने मागवल्या ६५ हजार लसी
Sandip Tirthpurikar

औरंगाबाद - aurangabad

कोरोनाचा (corona) संसर्ग वाढण्याचा धोका विचारात घेऊन औरंगाबाद महापालिकेने (Municipality) आवश्यक तयारी सुरू केली आहे. शहरात कोरोना चाचण्या करण्यासाठी ७ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तसेच शासनाकडे कोरोना प्रतिबंधक लसींचा (Vaccination) ६५ हजार डोसचा साठा मागवला आहे.

मागील वेळी शहरात कोरोना संसर्गाचा झपाट्याने फैलाव झाला होता. मनपाने कोविड सेंटर सुरू करून नागरिकांवर उपचार केले होते. त्यानंतर लसीकरण मोहीम देखील प्रभावीपणे राबविण्यात आली. शहरातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. शहरातील १० लाख ५५ हजार ६५४ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. यातील ८६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दुसर्‍या डोसचे ६८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. १५ ते १७ वयोगटातील ६९ हजार ९९८ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते त्यातील ६६ टक्के जणांना पहिला तर ५१ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ ते १४ वयोगटातील ४५ हजार २५५ जणांना कोरोना लस देण्याचे टार्गेट ठेवले होते. त्यापैकी ७१ टक्‍के लोकांना पहिला तर ४८ टक्के जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. संपूर्ण वयोगट मिळून ८५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून करण्यात आला आहे.

शहरात पुन्हा कोरोना संसर्ग वाढविण्याची शक्‍यता असल्याने शासनाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने तयारी सुरू केली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या हृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यात येणार आहे. सध्या कोव्हॅक्सिनच्या १६ हजार लसी उपलब्ध असून या लसींची मुदत ३१९ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या लसी परत मिळणार आहे. तसेच लसीकरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ५० हजार कोविशिल्ड आणि १५ हजार कोर्बोव्हॅक्स अशा ६५ हजार लसींची मागणी करण्यात आली आहेत. 

रुग्णालये पण झाली सज्ज 
शहरात ३३४४ ऑक्सिजन बेड मनपाच्या मेल्ट्रॉन, एन-८, एन-११, नेहरूनगर, आयओसी पदमपुरा या पाच आरोग्य केंद्रात ऑक्सिजनचे ६४५ बेड आणि दहा व्हेंटिलेटर आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालय मिळून व्हेंटिलेटरचे ४०२, आयसीयू आणि ऑक्सिजनचे ५४०, ऑक्सिजनचे ३३४४ आणि आयसोलेशनसाठी ३८५५ असे एकूण ८१४१ बेड उपलब्ध असणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com