व्हर्टिकल गार्डनमुळे हवा झाली शुद्ध ; औरंगाबाद महापालिकेचा दावा

व्हर्टिकल गार्डनमुळे हवा झाली शुद्ध ; औरंगाबाद महापालिकेचा दावा

औरंगाबाद- aurangabad

राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमाअंतर्गत (National Clean Air Initiative) महानगरपालिकेने (Municipal Corporation) शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डनची (Vertical Garden) उभारणी केली असून, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण घटले आहे. परिणामी शहरातील प्रदूषणाची पातळी कर्मी झाली आहे, असा महानगरपालिकेने केला आहे.

केंद्र शासनाच्या (Central Govt) राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रमांतर्गत महापालिकेने पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे ६५ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रदूषण नियंत्रणासाठी, हवेतील धुलिकणांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी व्हर्टिकल गाडनचा उभारणी, स्वीपिंग मशिनच्या साह्याने प्रमुख रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण, प्रमुख चौकांमध्ये कारंजांची उभारणी असे उपक्रम राबवले जात आहेत. आठ ठिकाणी व्हर्टिकल गाडनची उभारणी करण्यात आली असून, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम तीन वर्षांसाठी खासगी संस्थेला देण्यात आले आहे. प्रमुख चौकांमध्ये कारंजे उभारण्याचे कामदेखील येत्या काही दिवसांत सुरू केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा केला आहे. स्वच्छतेच्या जागतिक निकषानुसार २०१९ मध्ये शहरातील वायूप्रदूषणाचे प्रमाण ७६ मायक्रॉन होते; तर २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ६४ मायक्रॉनवर आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवलेले मानक ६० मायक्रॉन इतके आहे. २०२२-२३ या वर्षात औरंगाबाद शहर हे मानक गाठेल. येणाऱ्या काळात हवेतील धुलीकणांचे प्रमाण साठ किंवा त्यापेक्षा कमी असेल, असा दावा महानगरपालिकेने केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com