औरंगाबादमध्ये आता पेट्रोल पंपावरच मिळणार लस!

अभिनव उपक्रम सुरू  
औरंगाबादमध्ये आता पेट्रोल पंपावरच मिळणार लस!

औरंगाबाद - aurangabad

विदेशात अनेक ठिकाणी (corona) करोनाची तिसरी लाट येऊन धडकली असताना लसीकरण हा एकमेव पर्याय सध्या जगासमोर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यात सर्वच जिल्ह्यात लसीकरणाचा (Vaccination) टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. तर, याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आता (Petrol pump) पेट्रोल पंपावरच लसीकरणाची सुविधा देण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्रशासनाने 'नो वॅक्सिन, नो पेट्रोल' असे आदेश काढले होते. त्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने लस घेतली की नाही याची खात्री करूनच पेट्रोल देण्यात येत होते. मात्र ज्यांनी लस घेतली नाही त्यांना पेट्रोल दिले जात नव्हते. पण आता थेट पेट्रोल पंपावरच लसीकरण उपलब्ध करून दिले आहे. पेट्रोलपंपावर लस मिळत असल्याने नागरिकांना याचा फायदा होत आहे.

औरंगाबाद पेट्रोल पंप असोसिएशन आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपवर लसीकरण कॅम्प लावण्यात आले आहे. तर पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या ज्या ग्राहकांनी लस घेतली नाही त्याला जागेवरच लस घेण्याची सुविधा उपलब्ध होत असल्याने लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पेट्रोल पंपवर लसीकरण उपलब्ध करून देण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. सुरवातीला औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काही कठोर नियमांची घोषणा केली.

लस असेल तरच पेट्रोल, किराणा, रेशन, दारू आणि इतर सुविधा मिळतील असे आदेश काढले. त्यानंतर काही पेट्रोल पपं आणि इतर दुकानांवर कारवाई सुद्धा केली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने व्यवसायिक आदेशाचे पालन करू लागले आणि सुविधा मिळत नसल्याने नागरिक ही लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com