Monday, April 29, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत लसीचा काळाबाजार!

औरंगाबादेत लसीचा काळाबाजार!

औरंगाबाद – Aurangabad

शासनाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या (Corona vaccination) कोरोना लसींचा काळाबाजार (Black market) करून एका डोससाठी तब्बल 300 रुपये घेत शासनाची फसवणूक करणाऱ्या आरोग्य सेवक गणेश रामदास दुरोळे (37, रा. भारतमाता नगर, हडको) आणि सुपरवायझर तथा आरोग्य सेवक सैय्यद अमजत (54, रा. किराडपुरा) यांना एमआयडीसी (MIDC) वाळूज पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले.

- Advertisement -

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून लसींच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्‍यातील एक बाटली रिकामी आहे. या दोन्ही आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी दिले.

या प्रकरणात गंगापूर तालुक्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक वसंतराव कांबळे (44) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, वाळूज पोलिसांनी माहिती मिळाली की, रांजणगाव शे.पुं. येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवक गणेश दुरोळे हा नागरिकांकडून पैसे घेऊन साजापूर चौकात कोरोनावरील लस देत आहे. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून गणेश दुरोळे यांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीकडून लसींच्या तीन वॉयल, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा सुमारे 3 हजार 700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दुरोळे याची चौकशी केली असता, सदरील लस सुपरवायझर तथा आरोग्य सेवक सय्यद अमजत यांच्याकडून घेतल्याचे सांगितले.

या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ‘आरोपींनी सदरील वॉयल कोणत्‍या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून घेतली याचा तपास करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे, आरोपीने किती नागरिकांना पैसे घेऊन लस दिली व त्‍यातील किती नागरिकांनी मोफत लस दिल्याची कोव्‍हीन अॅपवर नोंदणी केली? आरोपीने कोणत्‍या शिक्षकामार्फत नोंदणी केली? त्‍याचा गुह्यात सहभाग आहे का? नागरिकांना लस देण्‍यासाठी आरोपींकडे कोण पाठवत होते? याचा तपास बाकी आहे. तसेच आरोपींनी यापूर्वी देखील असा गुन्हा केल्याची दाट शक्यता असल्याने आरोपींना पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यानंतर सदरील आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या