औरंगाबाद जिल्ह्यात साडेनऊ लाख नागरीकांना लसीकरण

औरंगाबाद जिल्ह्यात साडेनऊ लाख नागरीकांना लसीकरण

लसीकरणाची गती मंदावली

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात 13 जुलैपर्यंत एकूण 957679 (पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या) जणांचे कोविड लसीकरण (Covid vaccination) झाले असून 13 जुलै रोजी 8929 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 3116 जणांनी तर शहरात 5813 जणांनी लस घेतली असल्याचे (Collector Office) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

13 जुलैपर्यंत ग्रामीणमध्ये 360980 जणांनी पहिला डोस घेतला तर 94458 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये 455438 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 377315 जणांनी पहिला डोस घेतला तर 124926 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात 502241 जणांचे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com