चार महिन्यात साडेपाच लाख नागरिकांचे लसीकरण

115 वॉर्डात लसीकरण केंद्र
चार महिन्यात साडेपाच लाख नागरिकांचे लसीकरण

औरंगाबाद - Aurangabad

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. चार महिन्यात 5 लाख 51 हजार नागरिकांना लस टोचण्यात आली. यामध्ये पाहिला डोस घेणारे 4 लाख 24 हजार 697 आणि दुसरा डोस घेतलेल्या 1 लाख 26 हजार 312 नागरिकांनी लस घेतली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढतच चालली होती. पहिल्या लाटेतील रुग्णांची संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाछयांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर्सला लस देण्यात आली.

तिसर्‍या टप्प्यात 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांचे लसीकरण सुरू केले. 1 एप्रिलपासून 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले.

मात्र या लसीकरणाला अवघ्या दहा दिवसात तात्पुरती स्थगिती देण्यात आली. चार महिन्यात लसीकरण मोहिम राबविताना आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेतले आहे. शहरात महापालिकेने जंम्बो लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 115 वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानंतर आजपर्यंत 2 लाख 93 हजार 38 नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.

यात भीमनगर, आरेफ कॉलनी, गरमपाणी, हर्षनगर, जिन्सी रेंगटीपूरा, औरंगपुरा, बायजीपूरा, गांधीनगर, नेहरुनगर, जवाहर कॉलनी, गुरुकुल शाळा, राज नगर, पीरबाजार, चिकलठाणा, नारेगाव, जुना बाजार, नक्षत्रवाडी, सिल्कमिल कॉलनी, बन्सीलालनगर, सिडको एन-8, सिडको एन-11, विजयनगर, सातारा, शहाबाजार, मसनतपूर, चेतनानगर, गणेश कॉलनी, सादातनगर, मुकुंदवाडी, शिवाजीनगर हे आरोग्य केंद्र तसेच छावणी परिषद, हर्सुल मनपा केंद्रीय शाळा, आयएमए हॉल, न्यु इंग्लिश स्कुल, अय्यपा मंदिर जवळ देवळाई, वंदे मातरम शाळा पुंडलीकनगर, जीवन विकास प्रतिष्ठान जयभवानीनगर, भगवान पालिका शाळा अजबनगर या 37 केंद्रांवर कोविशिल्ड लस मिळणार आहे. कोवॅक्सिन लसीकरणासाठी राजनगर, क्रांतीचौक, एमआयटी हॉस्पिटल, एन-4 या ठिकाणी व्यवस्था केली आहे.

शहरात 2 लाख 14 हजार 808 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. 78 हजार 230 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ग्रामीण भागात 2 लाख 57 हजार 971 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. 2 लाख 9 हजार 889 जणांनी पहिला डोस घेतला असून 48 हजार 82 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com