आजपासून १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ

मोठ्यांचे लसीकरण मंदावले 
आजपासून १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ

औरंगाबाद - aurangabad

एकीकडे ओमायक्रॉनच्या (Omycron) रुग्णसंख्येत वाढ होत असताना शहरी भागात लसीकरण (Vaccination) मंदावल्याने पाहावयास मिळत आहे. दरम्यान, आजपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होत आहे. मात्र दुसरीकडे अजूनही १८ वर्षांवरील अनेक लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटलेले नाही. त्यामुळे नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झालेली दिसते.

औरंगाबाद शहरात एकूण ६ केंद्रांवर ही लस दिली जाईल. मुलांच्या लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी प्रमाणेच लसीकरण केंद्रावर सुद्धा नोंदणी करून लस दिली जाईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

लसीकरणास टाळाटाळ

१ डिसेंबर रोजी शहरात १०,३३६ आणि ग्रामीण भागात २५,८५९ असे ३६ हजार १९५ जणांचे लसीकरण झाले. ७ डिसेंबर रोजी शहरात ५०५ तर ग्रामीण भागात १६,६६६ असे २१,७२० लसीकरण झाले. २० डिसेंबर रोजी शहरात ३,५०१ आणि ग्रामीण भागात ८,७१३ असे १२,२१४ लसीकरण झाले. २९ डिसेंबर रोजी हे प्रमाण आणखी घटून शहरात २७६९ तर ग्रामीण भागात ६,७०६ असे ९,४७५ लसीकरण झाले. एक जानेवारी रोजी शहरात केवळ २,९१७ तर ग्रामीण भागात ५,१५६ असे ८०७३ इतकेच लसीकरण झाले.

येथे होणार मुलांचे लसीकरण

● क्रांती चौक आरोग्य केंद्र

● राज नगर आरोग्य केंद्र

● एमआयटी हॉस्पिटल, सिडको- एन-4 अंबिकानगर आरोग्य केंद्र

● मेल्ट्रॉन हॉस्पिटल, एमआयडीसी चिकलठाणा

● प्रियदर्शनी विद्यालय, मयुरबन कॉलनी

● एस. बी. ओ. ए. पब्लिक स्कूल, हडको एन -११

Related Stories

No stories found.