औरंगाबाद जिल्ह्यात 8 लाख 32 हजार 208 जणांचे लसीकरण

डॉ. महेश लड्डा यांनी दिली माहिती
औरंगाबाद जिल्ह्यात 8 लाख 32 हजार 208 जणांचे लसीकरण

औरंगाबाद - Aurangabad

जिल्ह्यात दि.1 जुलै 2021 पर्यंत एकूण 832208 (पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या) जणांचे (Covid vaccination) कोविड लसीकरण झाले असून 1 जुलै रोजी एकूण 1834 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 629 जणांनी तर शहरात 1205 जणांनी लस घेतली असल्याचे (Collector) जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉ. महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

1 जुलै 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 320589 जणांनी पहिला डोस घेतला तर 64282 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकूण 384871 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 347983 जणांनी पहिला डोस घेतला तर 99354 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकूण 447337 जणांचे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com