औरंगाबाद जिल्ह्यातील 4,42,339 जणांचे लसीकरण

शहरी भागात 421 जणांचे लसीकरण
औरंगाबाद जिल्ह्यातील  4,42,339 जणांचे लसीकरण

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात 1 मे रोजी एकूण 3456 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 3035 जणांनी तर शहरात 421 जणांनी लस घेतली . जिल्ह्यात दि. 1 मे 2021 पर्यंत एकूण 442339 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा सनियंत्रण अधिकारी डॉ महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

1 मे 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 185875 जणांनी पहिला डोस घेतला तर 20622 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 206497 जणांचे लसीकरण झाले आहे. तर शहरामध्ये 189995 जणांनी पहिला डोस घेतला तर 45847 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 235842 जणांचे लसीकरण झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com